सावदा, ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या जिल्हा दौर्यावर येत आहेत.
सध्या गुरांवर लंपी या संसर्गजन्य रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गुरांवर याचा संसर्ग आढळून आला आहे. या अनुषंगाने लंपीबाबत पाहणी करून बैठक घेण्यासाठी राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या जिल्हा दौर्यावर येत आहेत.
उद्या दुपारी साडेबाराच्या सुमारास ना. राधाकृष्ण विखे पाटील हे जळगावात दाखल होणार आहेत. अजिंठा विश्रामगृहात ते येतील. येथून ते खिरोदा आणि रावेर येथे लंपी रोगाने ग्रस्त झालेल्या गुरांची पाहणी करणार आहेत. यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ते जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.