मुक्ताईनगरच्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीसाठी निधी मंजूर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजासाठी नवीन शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीसाठी आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

मुक्ताईनगर येथे सन २०१५ मध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता नवीन कार्यशाळा व प्रशासकीय संस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. या इमारतीसाठी शासनाकडून एकूण ५७.५६ कोटीच्या निधीस मंजुरीही देण्यात आली होती. या इमारतीसाठी आजपर्यंत २९ कोटी २० लाख ६० हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी इमारतीच्या पूर्णत्वासाठी उर्वरित निधीची आवश्यकता असल्याने तत्कालीन अल्पसंख्याक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासनाने २५ ऑगस्ट २०२२ रोजी परिपत्रक जारी करून मुक्ताईनगर येथील अल्पसंख्याक समाजाच्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीसाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरचा निधी शासनाकडून तंत्र शिक्षण संचालनयाला वर्ग करण्यात आला आहे.

Protected Content