आगग्रस्त महिलेला महापौर-उपमहापौरांनी दिला धीर ! ( व्हिडीओ )

सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन; नगरसेवक गणेश सोनवणेंची पाच हजारांची मदत

जळगाव, निखील वाणी । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातला रेणुका नगरात लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या महिलेची महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन तिला मदतीचे आश्‍वासन दिले.

याबाबत वृत्त असे की, रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनच्या घराला आज सकाळी अकस्मात आग लागली. यात शेड जळून खाक झाले. यामध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह राहत होते. या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. आपले घर जळून खाक झाल्याची दिसताच त्या महिलेला भोवळ आली. परिसरातील नागरिकांनी तिला धीर दिला.

हा व्हिडीओ देखील पहा : रेणुकानगरातील घराला आग; वस्तू जळून खाक !

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने या महिलेची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी, ललीत धांडे, अनिल सोनवणे यांची उपस्थिती होती. आगीमुळे या महिलेचा संसार उघड्यावर आला असल्याने ती या मान्यवरांना पाहून रडू लागली. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांना धीर दिला. तर उपहापौर कुलभूषण पाटील यांनी या नुकसानीचा शासनातर्फे तातडीने पंचनामा करण्यात येऊन त्या महिलेला मदत केली जाईल असे आश्‍वासन दिली. तर, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी आगग्रस्त महिलेला तातडीने पाच हजार रूपयांची मदत देखील दिली.

खालील व्हिडीओत पहा या घटनेचा व्हिडीओ.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.