जळगाव प्रतिनिधी- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला असून या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री Gulabrao Patil ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
याबाबत वृत्त असे की, शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वार्यासह पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जलधारा कोसळल्या. तर चाळीसगाव तालुक्यासह काही तालुक्याच्या ठिकाणी तुफान गारपीट झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने शेतकर्यांची जबर हानी झाली आहे.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी या नुकसानीची तातडीने दखल घेतली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले आहेत. परिणामी, कृषी व महसूल खात्यातर्फे तात्काळ कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.