जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील रथ चौकात दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत केले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रथचौकातील जोशी पेठ येथे दुचाकी लावण्यावरून दोन गटांमध्ये तूफान हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणाचा हात मोडला, तर चार जणांना शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना सायंकाळी साडेचार वेळेच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हाणामारी करणार्यांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.