डॉ. विनोद पाटील यांनी स्वीकारला कुलसचिव पदाचा कार्यभार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून डॉ. विनोद पाटील यांनी कार्यभार स्वीकारला आहे.

डॉ. विनोद पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रजिस्ट्रार अर्थात कुलसचिव पदची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी आजवर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला नव्हता. मध्यंतरी नॅक पुनर्मुल्यांकन समिती आली असतांनाही विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपद होते.

या अनुषंगाने आज डॉ. विनोद पाटील यांनी कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्‍वरी यांच्यासह अन्य मान्यवरांनी स्वागत केले. डॉ. पाटील यांनी कार्यभारी स्वीकारल्यामुळे विद्यापीठातील प्रभारी राज पूर्णपणे संपुष्टात आले आहे.

Protected Content