जळगाव प्रतिनिधी । शहरात सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबित करण्यात येईल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे
शहरातील प्रत्येक परवाना धारक ऑटोरिक्षाला मोटर वाहन नियमानुसार इलेक्ट्रानिक्स मीटर असणे व ते सुस्थीतीत असणे देखील बंधनकारक आहे. कुठल्याही परिस्थीत परवाना अटींचे उल्लंघन करता येणार नाही. सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी ऑटोरिक्षा फेअरमीटर कॅलिब्रेशन करुन घ्यावे तसेच प्रवाश्यांची मागणी असल्यास फेअरमीटरचा वापर करुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेले ऑटोरिक्षा भाडे तक्ताप्रमाणे भाडे घेण्यात यावे. नियमांचे पालन न करणाऱ्या परवाना धारकांविरुध्द मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.