धनगर समाजाला १० दिवसात आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार ( व्हिडीओ )

जळगाव । धनगर समाजाला १० दिवसांमध्ये आदिवासींचे लाभ देणारे आरक्षण न मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आज ऐक्य परिषदेत राज्याचे समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला.

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याचे समन्वयक शशिकांत तरंगे आज जळगावात जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील दापोरेकर मंगल कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधवांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत श्री तरंगे यांनी सर्वाना धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा यावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. तरंगे म्हणाले की, अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षनाच प्रश्‍न प्रलंबित असून वारंवार धनगर समाजाच्या आरक्षणनाचा प्रश्‍नी शासनाच्या वतीने वेळेवेळी आश्‍वासन दिली मात्र अजून धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी धनगर समाजाने एक होणे गरजेचे आह.

ते पुढे म्हणाले की, अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित असून वारंवार धनगर समाजाच्या आरक्षणनाचा प्रश्‍ननी शासनाच्या वतीने वेळेवेळी आश्‍वासन दिली मात्र अजून धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी धनगर समाजाने एक होणे गरजेचे आहे. आरक्षण प्रश्‍नी कितीही संघटना असे पण समाजासाठी एक होणे गरजेचे आहे असे यावेळी डॉ शशिकांत तरंगे म्हणाले. आगामी काळात आरक्षण संदर्भात सरकारने भूमिका न घेतल्यास धनगर समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऐक्य परिषदेने दिला आहे.

या वेळी धनगर ऐक्य परिषदेचे समनव्यक डॉ शशीकांत तरंगे, समनव्यक विजयराव तमनर, भरत येवस्कर, डॉ संदीप मनोरे पोपट धनगर, माजी महापौर सदाशिव ढेकळे, बाळू कंखरे, दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.

खालील व्हिडीओत पहा डॉ. तरंगे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/698735837403314

Protected Content