गर्दीमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा : जिल्हाधिकारी ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । यंदाची दिवाळी ही गर्दीमुक्त व प्रदूषणमुक्त या प्रकारात साजरी करण्यात यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. दिपावलीनिमित्त जिल्हावासियांनी दिलेल्या संदेशात ते बोलत होते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या संदेशात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याचे सूचित केले आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज आहेच. यामुळे नागरिकांनी यंदाची दिवाळी ही गर्दीमुक्त, फटाकेमुक्त व पर्यायाने प्रदूषणमुक्त या प्रकारात साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा वासियांना आवाहन केले आहे. या व्हिडीओची निर्मिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या सहकार्याने केली आहे.

खालील व्हिडीओत पहा जिल्हाधिकारी नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/300515761021208

Protected Content