जळगाव राहूल शिरसाळे । पारोळा तालुक्यातील मुलीवरील अत्याचार व तिच्या क्रूर हत्येचा निषेध करण्यासाठी आज भाजप महिला आघाडीतर्फे काव्य रत्नावली चौकात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले.
टोळी (ता. पारोळश) येथील दलीत तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला बळजबरीने विष पाजून खून केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या भयंकर घटनेचा सर्व स्तरांमधून निषेध करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सायंकाळी काव्य रत्नावली चौकात कँडल मार्चच्या माध्यमातून पिडीत तरूणीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रामूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खालील व्हिडीओत पहा कँडल मार्चची क्षणचित्रे !
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/692761755011064