भर चौकात एसटीचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकात आज सकाळी जळगाव ते पाचोरा या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. मात्र चालकाच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, जळगाव बस स्थानकावरून नऊ वाजेच्या सुमारास मिळालेली जळगाव पाचोरा बस क्रमांक एमएच-१४ डीजे २१७८ चा स्वातंत्र चौकात अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात होता होता टळला. ज्यावेळी बसचे ब्रेक फेल झाले त्यावेळी बसच्या समोर एक ऑटोरिक्षा व एक कार समोर आली. अशा बिकट अवस्थेत पाचोरा आगाराचे चालक जाकिर पठाण यांनी सावधानता बाळगून गिअर चा झटपट वापर करून वेगात असलेल्या बसवर ताबा मिळवला. याप्रसंगी बसमधील प्रवाशांनी व स्वातंत्र्य चौकातील नागरिकांनी श्री पठाण यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, संबंधीत चालक जाकीर पठाण यांनी घटनेची सर्व माहिती संबंधित अधिकार्‍यांना दिली तदनंतर जळगाव आगारातील मेकॅनिकल यांनी बसची तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली ही बस पूर्ण सुधारणा करण्यासाठी जळगाव आगारात आणत असताना परत एकदा तरी भेट झाल्याने बसस्थानकात गोंधळ निर्माण झालेला होता चालकाची मनस्थिती खराब झाल्यामुळे जळगाव आगाराच्या कर्मचार्‍यांनी बस चालवत आणली देखील परत एकदा ब्रेक डाऊन झाल्यामुळे चालक जाकिर पठाण यांना खाली उतरून अपघात घडू नये म्हणून बसस्थानकातील प्रवाशांना सूचना द्यावी लागली त्यानंतर पठाण यांनी अधिकार्‍यांना पुनश्‍च संपूर्ण माहिती दिली परंतु त्यांनी देखील यथोचित सहकार्य केले नसल्याचे श्री पठाण यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे श्री पठाण यांची प्रकृती खराब झाली असल्याने त्यांनी उपचार करण्यासाठी दवाखान्याकडे धाव घेतली आहे

Protected Content