जळगाव सचिन गोसावी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिशय दुर्मीळ प्रकारची व्याधी समजल्या जाणार्या सिरोमोमेलिया या प्रकारातील कन्या जन्माला आली. तिचे दोन्ही पाय एकमेकांना जुडलेले असल्यामुळे ती एखाद्या मत्स्यकन्येसारखी दिसत होती. मात्र अवघ्या १२ तासांमध्ये ती मृत्यूमुखी पडली आहे. तर, मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या दुर्मीळ रोगाबाबत माहिती व्हावी म्हणून तिचे पार्थिव रासायनिक प्रक्रिया करून जतन करून ठेवण्यात आले आहे.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका महिलेने एका मत्स्यासारखी म्हणजे माशासारखी घडण असलेल्या दुर्मीळ बाळाला जन्म दिला. दुर्दैवाने या बाळाच्या वाट्याला अवघ्या बारा तासांचे आयुष्य आले. खान्देशातील कदाचित हे असे पहिलेच बाळ असेल, असा दावा केला जात आहे. शनिवारी पहाटे या बाळाचा मृत्यू झाला , मात्र , दुर्मीळ असल्याने अभ्यासासाठी त्याचा मृतदेह शरीररचनाशास्त्र विभागात ठेवण्यात आला आहे .
धरणगाव तालुक्यातील एका गावातील एका महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ . संजय बनसोडे आणि डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. प्रसूती होत असताच बाळाची घडण अत्यंत दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यात बाळाचे दोन्ही पाय एकमेकांना जुडलेले असल्याने ते मत्स्यकन्येसारखे दिसून असल्याचे दिसून आले. तथापि, या अर्भकाला अनेक जन्मजात विकार असल्यामुळे अवघ्या १२ तासांमध्ये त्याने शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान, हे शिशू सिरोमोमेलिया या दुर्मीळ व्याधीने ग्रस्त असल्याने ते मत्स्यकन्येसारखे दिसत असल्याची माहिती मेडिकल कॉलेजच्या स्त्री रोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरूण कसोटे यांनी दिली. तर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याचे अध्ययन करता यावे म्हणून या बाळाच्या मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून ते जतन करून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
खालील व्हिडीओत पहा या दुर्मीळ बाळाबाबतचा वृत्तांत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3556712131071330