जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद प्रभाकर भंगाळे (वय-३७) रा. सरस्वती नगर, जामनेर हे आपल्या कुटुंबियांचं वास्तव्य आहे. ते जळगाव जिल्हा परिषद येथे नोकरीला आहे. सोमवार ३ आक्टोंबर रोजी १०.३० वाजता ते दुचाकी (एमएच १९ बीडी ५५५८) ने जिल्हा परिषद कार्यालयात आले. त्यांनी पार्किंग झोनमध्ये त्यांची दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्याची १५ हजार रुपये किमतीची दुचाकीची चोरी झाल्याचे उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.