जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादग्रस्त पोलीस अधिकारी किरण बकालेंचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
एलसीबीचे तत्कालीन प्रमुख पोलीस निरिक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाबाबत अत्यंत भयंकर प्रकारे केलेले वक्तव्य हे सोशल मीडियाच्या माध्यातून व्हायरल झाल्याने राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. याची दखल घेऊन किरण बकालेस तात्काळ निलंबीत करण्यात आले. नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
बकाले हे निलंबीत झाल्यानंतरही नियमानुसार विहीत ठिकाणी हजर न होता भूमिगत झाले. यानंतर त्यांच्यातर्फे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या सुनावणीच्या दरम्यान मराठा समाजातर्फे तब्बल ४७ वकिलांनी बाजू मांडण्यासाठी मदत केली. ज्येष्ठ विधीज्ज्ञ गोपाळ जळमकर आणि त्यांच्या सहकार्यांनी बकालेंच्या जामीनास कडाडून विरोध केला. यामुळे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर सुनावणी होऊन आज उच्च न्यायालयानेही त्यांना जामीन अर्ज फेटाळून लावल्याचे वृत्त आहे.