जळगाव प्रतिनिधी । सहकारातील निवडणुकांची धामधुम सुरू होण्याची चिन्हे असतांनाच कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत भाजप व अपक्ष अशा १३ संचालकांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असून ते याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेणार आहेत. बुधवारी बैठक घेऊन १३ संचालकांचे सामूहिक राजीनामे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.
बाजार समितीच्या आवारातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या विषयावरून संचालकांमध्ये वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे. सभापती चौधरी हे कुणालाही विश्वासात न घेता त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कृउबास जळगावचे संचालक मंडळ सामूहिक राजीनामा देत आहे. त्या पत्रावर पंकज पाटील, प्रभाकर पवार, सुनील महाजन, अनिल भोळे, भरत बोरसे, लक्ष्मण पाटील, उपसभापती सुरेश पाटील, प्रशांत पाटील, विमलबाई भंगाळे, यमुनाबाई सपकाळे, भरत बोरसे, सरला पाटील, सिंधूबाई पाटील या संचालकांनी स्वाक्षर्या केलेल्या आहेत.