भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी अजय भोळे यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील माजी नगरसेवक तथा भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी अजय भोळे यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात व विशेष करून नगरपालिकेतील आक्रमक चेहरा म्हणून अजय भोळे यांची ओळख आहेे. अलीकडच्या काळात त्यांच्यावर अनेकदा अन्याय झाला तरी त्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे. एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा त्याग केल्यानंतर भोळे यांचे चांगले पुनर्वसन करण्यात येईल असे मानले जात आहे. या अनुषंगाने नुकत्याच जाहीर झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

आपल्या नियुक्तीबद्दल अजय भोळे म्हणाले की, भाजपचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आपण आजवर प्रयत्न केलेले आहेत. आधी ओबीसी सेलच्या माध्यमातून राज्यभरात पक्षाचे कार्य केल्यानंतर आता जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी आली असून आपण याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाचे नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू राहील असे अजय भोळे म्हणाले.

Protected Content