Home Cities जळगाव अभिषेक पाटलांचा कार्य अहवाल शरद पवार यांना सादर

अभिषेक पाटलांचा कार्य अहवाल शरद पवार यांना सादर

0
29

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या कार्याचा अहवाल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

अभिषेक पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीत ऐन वेळेस तिकिट मिळूनही जळगावातून चांगली लढत दिली होती. यानंतर पक्षाचे महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी वेळोवेळी विविध आंदोलन, निवेदने, निषेध मोर्चे आदींच्या माध्यमातून पक्षाच्या वृध्दीसाठी काम केले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेणारा कार्य अहवाल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सादर करण्यात आला आहे.

अभिषेक पाटील यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल सादर केला. याप्रसंगी त्यांच्या सोबत अ‍ॅड. कुणाल पवार हे देखील उपस्थित होते.


Protected Content

Play sound