Home Cities जळगाव या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या जळगाव महापालिका निकाल: कौल कुणाच्या बाजूने?

या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या जळगाव महापालिका निकाल: कौल कुणाच्या बाजूने?


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काल जळगाव महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरू होत आहे. आपण या निवडणुकीचे सर्व निकाल या एकाच लिंकवर क्लिक करून वाचू आणि पाहू शकतात. थोड्या-थोड्या वेळाने ही लिंक रिफ्रेश करत रहा.

…………………………..

अपडेट मिळविण्यासाठी लिंक रिफ्रेश (Refresh) करत रहा…..

 

 

14:12 : शिवसेना-उबाठा पक्षाच्या चारही उमेदवारांनी प्रभाग-१७ मध्ये मारली बाजी

14:09 : अनिल अडकमोल व गायत्री राणे यांनी मानले मतदारांचे आभार

14:08 : आम्हाला आनंदच !… कुटुंबातील तिसरी पिढीचे महापालिकेत एन्ट्री – डॉ.अमृता सोनवणे

13:42 : महायुतीच्या विजयी उमेदवारांचा प्रचंड जल्लोष !

 

13:34 : जनतेने आम्हाला भरभरून आशिर्वाद दिला, हा जनतेचा विजय !- भाजपा कार्यालयात आ.राजूमामा भोळे

13:30 : मुलांच्या विजयाने कैलासआप्पा सोनवणे भारावले !

12:56 : निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

12:46 : प्रभाग १५ मधील महायुतीचे अरविंद देशमुख (भाजपा), चेतन शिरसाळे (भाजपा), काळे रेशमा कुंदन (शिवसेना), प्रकाश रावलमल बालानी (भाजपा) उमेदवार विजयी

12:32 : प्रभाग ८ ‘अ’ मधून कविता पाटील तर प्रभांग १० ‘ड’ मधून जाकीर खान पठाण विजयी

12:18 : प्रचंड विजयाने आरोपांच्या भिंती कोसळल्या : सरीताताई माळी यांची भावपूर्ण प्रतिक्रिया

12:10 : संकटात सर्व जण आमच्या पाठीशी उभे राहिले ! : पियुष कोल्हे यांचे भावपूर्ण उदगार

12:08 : जनतेच्या प्रेमाने भारावलो : राजेंद्र घुगे-पाटील

12:06 : प्रभाग ४-ब मधून विद्या मुकुंदा सोनावणे विजयी

12:01 : प्रभाग ७ मधून चंद्रशेखर अत्तरदे यांची आघाडी

11:57 : जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याचा आनंद : निकिता वंजारी

11:55 : प्रभाग-१३ मध्ये महायुतीचा डंका : तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी !

11:53 : प्रभाग-११ मध्ये आम्ही केलेल्या कामांची पावती मिळाली : सरीताताई माळी-कोल्हे

11:49 : प्रभाग क्रमांक १८ “ब’ मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे आणि “क” मधून अनिता सुरेश भापसे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी, प्रभाग १९ मधील निकिता वंजारी विजयी झाल्या आहेत. भाजपचे राजेंद्र घुगे पाटील, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर, नितीन सपके, सुरेखा तायडे हे विजयी झाले तर प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार ललित विजयराव कोल्हे, सिंधूताई विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील असे महायुतीचे एकुण ११ उमेदवार विजयी झाले आहेत.

11:43 : प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपाचे उमेदवार अरविंद देशमुख विजयी

11:41 : प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ विद्या मुकुंदा सोनवणे विजयी

11:40 : प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर हे तिघे उमेदवार विजयी

11:38 : प्रभाग ५ मधील महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवर

11:32 : प्रभाग ४ ड चे उमेदवार पियुष ललित कोल्हे यांची ५ हजार मतांची मोठी आघाडी

11:28 : प्रभाग ११ मधील शिवसेनेचे ललित विजय कोल्हे, सिंधूताई विजय कोल्हे, डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील चारही उमेदवार विजयी

11:21 : जळगाव महापालिका निकाल-२०२६

11:18 : प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार ललित विजय कोल्हे (११०२), सिंधूताई विजय कोल्हे (१२००), डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील (९५०)सर्व उमेदवार आघाडीवर

11:17 : प्रभाग क्रमांक ३ क मधील शिवसेनेचे प्रविण रामदास कोल्हे आघाडीवर

11:14 : प्रभाग क्रमांक-१८ मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी

11:11 : प्रभाग क्रमांक १८ ब मधून नलुबाई तुळशीदास सोनवणे आणि “क” मधून अनिता सुरेश भापसे हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी

11:07 : प्रभाग क्रमांक १३ महायुतीचे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर हे तीनही उमेदवार आघाडीवर

11:04 : प्रभाग क्रमांक-19 मध्ये महायुतीला विजयी आघाडी !

11:03 : प्रभाग क्रमांक ५ माजी महापौर विष्णू भंगाळे हे आघाडीवर

10:59 : प्रभाग क्रमांक १९ मध्ये महायुतीला विजयी आघाडी (निकिता वंजारी-शिवसेना, राजेंद्र घुगे पाटील-भाजप)

10:57 : प्रभाग क्रमांक १८ मधील शिवसेनेचे उमेदवार अनिता भापसे आणि नलूबाई सोनवणे आघाडीवर

10:54 : प्रभाग १९ मधून शिवसेनेच्या उमेदवार निकिता वंजारी तर भाजपचे उमेदवार राजेंद्र घुगे पाटील आघाडीवर

10:51 : प्रभाग क्रमांक ४ मधील महायुतीचे उमेदवार पियुष ललीत कोल्हे हे ८०० मतांनी आघाडीवर, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

10:50 : प्रभाग ५ मधील भाजपाचे उमेदवार माजी महापौर नितीन लढ्ढा ६५० मतांनी आघाडीवर ..

10:47 : प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार भाजपचे जयश्री राहूल पाटील हे २८७ तर भाजपचे चंद्रशेखर शिवाजी पाटील ५०० मतांनी आघाडीवर

10:46 : प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी महापौर ललित कोल्हे २२८ मतांनी आघाडीवर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

10:45 : प्रभाग १४ मधून जयश्री महाजन व सुनिल महाजन पुन्हा दोघांची आघाडी

10:44 : प्रभाग क्रमांक १२ मध्ये गायत्री राणे, नितीन बरडे दोन्ही उमेदवारांची आघाडी

10:43 : प्रभाग क्रमांक 12 आणि 14 मध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर

10:38 : प्रभाग १३ मधील भाजपच्या उमेदवार सुरेखा तायडे 548 मतांनी आघाडीवर

10:37 : प्रभाग १४ मधून भाजपचे उमेदवार सुनिल महाजन व जयश्री महाजन आघाडीवर

10:35 : प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल देवकर ६७७ मतांनी आघाडीवर

10:26 : मतमोजणीच्या ठिकाणी कसून तपासणी करूनच प्रवेश

10:19 : मतमोजणीस सुरूवात
निकाल ऐकण्यासाठी कुसुंबा येथील वखार महामंडळाच्या गेटवर उमेदवारांसह त्यांचे समर्थकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या ठिकाण पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

10:15 : मतमोजणीस प्रारंभ : थोड्याच वेळात येणार कल !

10:10 : मतमोजणीची उत्सुकता शिगेला : पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त !

जळगाव महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण सर करणार, याचा फैसला आज होणार आहे. ७५ जागांच्या या महापालिकेत १२ जागा आधीच बिनविरोध निवडून आल्या असून, उर्वरित ६३ जागांसाठी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कुणाचे पारडे जड ठरणार आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :
प्रभाग २ मधून सागर श्यामकांत सोनवणे, प्रभाग ७ मधील दीपमाला काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे, प्रभाग ९- मनोज सुरेश चौधरी, प्रतिभा गजानन देशमुख, प्रभाग १२ – उज्ज्वला मोहन बेंडाळे, प्रभाग १३ वैशाली अमित पाटील, प्रभाग १६ – डॉ. विश्वनाथ सुरेश खडके, प्रभाग १८ – डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, आणि प्रभाग १९ मधून रेखा चुडामण पाटील, विक्रम किसान सोनवणे हे बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

गुरुवारी, १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात जळगावकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला. एकूण ५३.५९ टक्के मतदान झाले असून, २ लाख ३४ हजार ९९६ मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद केले आहे. यामध्ये १ लाख २२ हजार ८५८ पुरुष, १ लाख १२ हजार १३३ महिला आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे.

कोण बनणार नगरसेवक? प्रभागातील आघाडी आणि पिछाडीची अचूक माहिती, विजयी उमेदवारांची यादी आणि जळगावच्या राजकारणातील प्रत्येक महत्त्वाची घडामोडी आपल्याला केवळ एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जात आहे. निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा!

 


Protected Content

Play sound