Home Cities जळगाव जळगावात विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू : येथे पहा लाईव्ह निकाल !

जळगावात विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू : येथे पहा लाईव्ह निकाल !

0
87


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणाच्या विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून लवकरच कल समोर येणार आहे.

जळगाव विधानपरिषदेची निवडणूक यंदा मोठ्या प्रमाणात गाजली. यात प्रामुख्याने पहिल्या टप्प्या महायुतीत ही जागा भाजपला सुटणार की शिवसेनेला ? यावरून मोठा पेच निर्माण झाला होता. यात भारतीय जनता पक्षाला ही जागा मिळाल्यावर उमेदवारी कुणाला मिळणार ? यावरून मोठा खल झाला. अखेर अनेक मातब्बर इच्छुकांना वगळून भाजपच्या वतीने पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनी उमेदवारी दाखल केली. मविआतर्फे शरद तायडे यांना उमेदवारी मिळाल्याने चौरंगी लढत निर्माण झाली.

माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर देखील चार उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली. अखेर रेश्मा कुंदन काळे आणि अनिल चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे शेवटी नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे यांच्यात लढत झाली. १८ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत तब्बल ९७ टक्के मतदान झाले. तर, आज म्हणजेच २१ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून अल्पबचत भवनात मतमोजणी सुरू झाली. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतपत्रीकांची मोजणी करण्यात आली.

आज सकाळी आठ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या असून थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे. प्रारंभी पहिल्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत.

( आम्ही या बातमीच्या लिंकवर निकाल अपडेट करणार आहोत. आपण थोड्या-थोड्या वेळाने रिफ्रेश करून ताजी माहिती जाणून घेऊ शकतात. )


Protected Content

Play sound