जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेतील दारूण पराभवानंतर आमदार राजूमामा भोळे Rajumama Bhole हे आज पहिल्यांदाच यावर सविस्तर भाष्य करणार असून यात ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडून २७ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे अतिशय नाट्यमय घडामोडी घडत शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर निवडून आला. भाजपचा त्याग करणार्या बहुतांश नगरसेवकांनी आ. गिरीश महाजन आणि आ. राजूमामा भोळे Rajumama Bhole यांच्यावर नाराजी व्यक्त केली. यात सर्वात जास्त टिकेचा रोख हा आ. भोळे यांच्याकडे असल्याचे दिसून आले. निकालाच्या दिवशी आ. भोळे यांनी संक्षिप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी आपण पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने आज आ. राजूमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. सायंकाळी चार वाजता ही प्रेस कॉन्फरन्स पक्षाच्या जिल्हा कार्यालयात होत आहे. यात ते नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.