जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या सुधारित निर्देशानुसार जळगाव जिल्हा हा तिसर्या लेव्हलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणून घ्या काय असतील हे निर्बंध !
जून महिन्याच्या प्रारंभी जळगाव जिल्ह्यातील निर्बंध बर्याच प्रमाणात हटविण्यात आले होते. जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी झाल्यामुळे आणि पॉझिटीव्हीटीचा दर खूप कमी असल्यामुळे काही बाबी वगळता संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे खोलण्यात आलेली आहे. कोचींग क्लासेस, देवस्थाने, शाळा व महाविद्यालये आदी वगळता जळगाव जिल्ह्यात आता अनलॉक झालेले आहे. मात्र आज राज्य सरकारने नवीन निर्देश जारी केले आहेत. यानुसार जळगाव जिल्हा हा तिसर्या लेव्हलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. यामुळे या लेव्हलसाठी असणारे निर्बंध आपल्या जिल्ह्यासही लागू राहतील हे स्पष्ट आहे. याबाबत जिल्हा प्रशासन लवकरच स्थानिक पातळीवरून निर्देश जारी करण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेले नवीन निर्बंध खालीलप्रमाणे आहेत.
* अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
* हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील.
* लोकल आणि रेल्वे बंद राहतील.
* मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील.
* 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील.
* स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी 2 पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील.
* लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल.
* बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
* शेतीविषयक सर्व कामे करता येतील.
* ई कॉमर्स दुपारी 2पर्यंत सुरु असेल.
* जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.
टिप : राज्य शासनाने आज निर्देश जारी केले असले तरी अद्याप जळगाव जिल्हा प्रशासनाने स्थानिक निर्बंधांची नवीन नियमावली जाहीर केलेली नाही. ही नियमावली जाहीर केल्यानंतरच नवीन नियम अंमलात येणार असल्याची कृपया नोंद घ्यावी.
अपडेट :
या वृत्तानंतर जिल्हाधिकार्यांनी नोटिफिकेशन काढून नवीन निर्बंधांची नियमावली जाहीर केली असून ती खालीलप्रमाणे आहे. हे नियम २७ जून रविवारपासून अंमलात येणार आहेत.
* अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने, कृषी संबंधित कामे वेळ – दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत मेडिकल दुकाने व वैद्यकीय सेवा वगळून
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने वेळ- सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू, शनिवार व रविवार पूर्णपणे बंद
* हॉटेल, रेस्टॉरंट बार वेळ- केवळ दुपारी ४ वाजेपर्यंत डायनिंग करिता ५० टक्के ग्राहक क्षमतेसह सुरू राहतील. दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा देता येईल. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद.
* सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, सायकलिंग व मॉर्निंग वॉक दररोज सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत. क्रीडा प्रकार व शूटिंग व तत्सम स्पर्धा दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत खेळता येतील.
* सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम २ तासांच्या आत सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत
* लग्न समारंभ ५० टक्के क्षमतेसह ४ वाजेपर्यंत. अंत्यविधी केवळ २० जणांच्या उपस्थितीत होईल.
* सार्वजनिक वाहतुकीमध्ये १०० टक्के क्षमतेसह परवानगी, आंतरजिल्हा प्रवास सुरू राहणार असून लेव्हल ५मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी ई-पास बंधनकारक
* सूक्ष्म, लघु व मध्यम आस्थापना नियमित राहतील. मजुरांसाठी स्वतंत्र वाहने ठेवावी लागतील.
* अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती, निर्यात प्रक्रिया वगळता अन्य आस्थापनेत ५० टक्केच क्षमता.
* सलून, ब्यूटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर ५० टक्के ग्राहक क्षमतेसह दुपारी ४ वाजेपर्यंतच.