Home Cities जळगाव सहकार पॅनलचे उमेदवार शामकांत सोनवणे यांचा विजय

सहकार पॅनलचे उमेदवार शामकांत सोनवणे यांचा विजय

0
33

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून मतदारसंघातून शामकांत बळीराम सोनवणे यांनी एकतर्फी विजय संपादन केला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडणूक लढविण्यात अडथळा आला. यामुळे त्यांनी आपले बंधू शामकांत सोनवणे यांना येथून महाविकास आघाडीतर्फे उभे केले. यात पहिल्यापासून त्यांचे पारडे जड असल्याचे अधोरेखीत झाले. यात त्यांनी आज एकतर्फी विजय संपादन केला आहे. या माध्यमातून सोनवणे कुटुंबातील नवीन सदस्य जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आला आहे.

दरम्यान, ताज्या कलानुसार महाविकास आघाडीला जिल्हा बँक निवडणुकीत एकतर्फी यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लवकरच मतमोजणी पूर्ण होणार आहे.


Protected Content

Play sound