जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सार्वजनीक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आजच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या बैठकीत मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरातील मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, एजाज भाई मलिक व किरण बच्छाव यांची तर कार्याध्यक्षपदी महापौर जयश्रीताई महाजन व उपकार्याध्यक्ष पदी अश्विनी देशमुख व सुचेता पाटील यांची निवड एकमुखाने करण्यात आली. सचिव राम पवार तर सहसचिव म्हणून अविनाश पाटील तर खजिनदार म्हणून खुशाल चव्हाण यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला रवींद्र भैय्या पाटील, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे ,महापौर जयश्रीताई महाजन, श्याम तायडे , पुरुषोत्तम चौधरी , जमील देशपांडे , मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, डॉक्टर राजेश पाटील, प्रमोद पाटील, सुरेंद्र पाटील ,अनंत जोशी, नितीन बरडे, सुचिता हाडा, सरिता माळी कोल्हे, डॉक्टर प्रताप जाधव , अनिल अडकमोल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव समितीचे व्यासपीठ हे जळगावच्या सामाजिक सौंदर्याचं व एकतेचे प्रतिक आहे . जळगाव शहरातील सर्व स्तरातील मतभेद मिटवून एका प्रेरणेने सर्व एकत्र येतात ही अत्यंत सकारात्मक गोष्ट जळगाव शहरात घडते आहे .ही शहरासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे . शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याचे काम समितीने करावं अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली संपूर्ण कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
अध्यक्ष – गुलाबराव पाटील: उपाध्यक्ष : चंद्रकांत सोनवणे माजी आमदार , एजाज मलिक , किरण बच्छाव; कार्याध्यक्ष : महापौर जयश्री महाजन: उप कार्याध्यक्ष : अश्विनी देशमुख , सुचेता पाटील: सचिव राम पवार: सहसचिव अविनाश पाटील आणि खजिनदार खुशाल आप्पा
दरम्यान, शिवजयंती समितीचे मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे , अशोकभाऊ जैन , गुलाबराव देवकर, गिरीष महाजन , चिमणराव पाटील , आ शिरीष चौधरी , सतीश पाटील , रवींद्रभैय्या पाटील , खासदार उन्मेष दादा पाटील , पी इ तात्या पाटील , आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील , आमदार संजय सावकारे
करीमभाई सालार यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
कार्यकारिणी समितीमध्ये नंदूदादा बेंडाळे , नितीन लढ्ढा, श्रीराम पाटील , स्मिताताई वाघ , बाळासाहेब सूर्यवंशी , डॉ राजेश पाटील , ललित कोल्हे , नवनाथ दारकुंडे , आबासाहेब कापसे , भीमराव मराठे , ज्योती चव्हाण , प्रतिभा देशमुख , अनंत जोशी , डॉ राधेश्याम चौधरी , दिलीप बारी , अनिल सोनवणे यांची निवड झाली आहे.
तसेच सुकाणू समितीत सरिता माळी कोल्हे , समीर जाधव , विकास मराठे , मनोज वाणी , मूविकोराज कोल्हे , फहीम पटेल , सुजित शिंदे , अब्बास खाटीक , केतन पाटील ,संजय सोनवणे , कुणाल पाटील यांची निवड झाली आहे.
शिवजयंती समितीच्या या महोत्सव सगळ्यासाठी खुला आहे . शासनाचे नियम पाळून आपण शिवजयंती साजरी करणार असल्याचे माजी अध्यक्ष लीलाधर सोनवणे , पुरुषोत्तम चौधरी , मुकुंद भाऊ सपकाळे , गनी मेमन यांनी सांगितले . कार्यक्रमाची रूपरेखा व भूमिका निमंत्रक शंभु पाटील यांनी मांडली .