जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन खात्याच्या अखत्यारीत असणार्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्याची विक्री करण्याच्या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.
मुकुंद ठाकूर याने वन जमीनीची खोटी कागदपत्रे करून जळगावातील काही जणांना याची विक्री करून पळ काढला आहे. तो सध्या फरार झालेला असून गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात तो यशस्वी ठरला आहे.
या प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अनुषंगाने बुधवारी दिलीप पंडित सोनवणे, रमेश आनंदा पाटील, रवींद्र विक्रम हटकर, अखंड सीताराम सिंग, सादीक खान शब्बीर खान, महेश रमेश पाटील व पंकज रमेश पाटील या सात जणांना अटक करण्यात आली आहे. आज या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा घोटाळा तब्बल साडेआठ कोटी रूपयांचा असून यात जळगावातील अनेक मोठ्या मंडळीचा हात असल्याची चर्चा आहे. आता यातील सात संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे त्या बड्या मंडळीवर देखील कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.