जळगाव प्रतिनिधी । येथील सबजेलमधून राकेश चव्हाण हा आरोपी फरार झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला पुन्हा अटक केले असले तरी या प्रकाराने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, राकेश चव्हाण हा आरोपी असून आज त्याची अमळनेर येथे तारीख होते. तारखेवरून कारागृहात आल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रात्री नऊच्या सुमारास घडला. यावेळी पोलीस मुख्यालयात कार्यरत असणारे प्रकाश कोकणे यांनी पाठलाग करून या आरोपीला तातडीने पकडले. यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली.
देवाण-घेवाणीतून घडला प्रकार ?
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या प्रतिनिधीने आरोपीला प्रत्यक्ष विचारले असता त्याने आपल्यासोबत तारखेवर आलेल्या पोलिसांनी माझ्याकडे पाच हजार रूपयांची मागणी केली होती. मी चार हजार दिले तरी ते पुन्हा मागणी करत होते. यामुळे आपण पळ काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. तर पोलिसांनी याचा इन्कार केला. तथापि, या गंभीर प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.
पहा : कारागृहातून कैदी फरार होण्याबाबतचा लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी दिलेला वृत्तांत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/727422811076753/