जळगाव लोकसभा मतदार संघात 19 तर रावेरमध्ये 16 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध

election

जळगाव प्रतिनिधी । सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. जळगाव लोकसभा मतदार संघात 19 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले असून 2 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र अवैध ठरले आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघात 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या नामनिर्देशपत्रांची छाननी निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक छोटे लाल पासी यांच्या उपस्थितीत व जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या समक्ष तर रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक सर्वसाधारण निरिक्षक डॉ. अजितकुमार यांच्या उपस्थितीत व अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या समक्ष करण्यात आली. यावेळी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

जळगाव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले 19 उमेदवार
उन्मेश भैय्यासाहेब पाटील (भारतीय जनता पार्टी),
राहुल नारायण बनसोडे- (बहुजन समाज पार्टी)
श्री.गुलाबराव बाबुराव देवकर- (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी),
मोहन शंकर बिऱ्हाडे- (राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्युलर))
संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील -(हिंदुस्थान निर्माण दल),
ईश्वर दयाराम मोरे- (बहुजन मुक्ती पार्टी),
रऊफ युसुफ शेख- (इंडियन युनियन मुस्लीम लीग),
अंजली रत्नाकर बाविस्कर- (वंचित बहुजन आघाडी),
शरद गोरख भामरे-सुतार (राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर)),
वंदना प्रभाकर पाटील- (महाराष्ट्र क्रांती सेना),
प्रदिप भिमराव मोतीराया- (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष)
सुभाष शिवलाल खैरनार (अपक्ष),
संचेती रुपेश पारसमल (अपक्ष),
अनंत प्रभाकर महाजन (अपक्ष),
गनीशाह इस्हाक शाह (अपक्ष),
ओंकार चेनसिंग जाधव (अपक्ष),
मुकेश राजेश कुरील (अपक्ष),
डॉ. सतीश भास्करराव पाटील (अपक्ष),
ललीत गौरीशंकर शर्मा (अपक्ष),
* नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेले 2 उमेदवार -1) स्मिता उदय वाघ आणि 2) संपदा उन्मेश पाटील

रावेर लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले 16 उमदेवार
डॉ. उल्हास वासुदेव पाटील-(कॉग्रेस),
रक्षा निखिल खडसे- (भारतीय जनता पार्टी),
योगेंद्र विठ्ठल कोलते- (बहुजन समाज पार्टी),
अडकमोल रोहीदास रमेश- (आंबेडक राईट पाटी ऑफ इंडिया),
अजित नामदार तडवी- (राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी),
नितीन प्रल्हाद कांडेलकर- (वंचित बहुजन आघाडी),
मधुकर सोपान पाटील- (हिंदूस्थान जनता पार्टी),
रोशन आरा सादीक अली- (इंडियन युनियन मुस्लिम लीग)
इम्रान रऊफ खान (अपक्ष),
गौरव दामोदर सुरवाडे (अपक्ष),
तंवर विजय जगन (अपक्ष),
नजमीन शेख रमजान (अपक्ष),
रविंद्र दंगल पवार (अपक्ष),
डी.डी. वाणी  (अपक्ष),
सुनिल पंडित पाटील (अपक्ष),
सुनिल संपत जोशी (अपक्ष)

Add Comment

Protected Content