जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिवजयंती निमित्त शिवचरित्र अभ्यासक प्रा. डॉ प्रमोदकुमार हिरे यांचे पावन खिंड या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या सिनेट हॉल येथे रविवार दिनांक १९ फ्रेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. डॉ प्रमोदकुमार हिरे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रा डॉ व्ही एल माहेश्वरी , प्र कुलगुरू डॉ एस टी इंगळे तसेच कुलसचिव डॉ विनोद पाटील पी ई तात्या पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
पी ई तात्या पाटील यांनी विद्यापीठास रुपये ११लाख दिलेल्या उदार देणगीतून दरवर्षी विद्यापीठात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. सकाळच्या सत्रात शिवजयंती निमित्त मिरवणूक ,पोवाडा आदी भरगच्च कार्यक्रम आहेत.
डॉ. प्रमोदकुमार हिरे यांची आतापर्यंत ३ पुस्तक व ३९ लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर ६० व्याख्यने देशात व विदेशात झालेली आहेत. तरी सदर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राकडून समन्वयक प्रा अजय पाटील यांनी केले आहे.