पहूर येथे ब्रह्माकुमारीज् महाशिवरात्री महोत्सवाचा शुभारंभ

पहूर,ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आयोजीत महाशिवरात्री उत्सवास येथे आजपासून प्रारंभ झाला आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने यावर्षी ऐतिहासिक भव्य शिवलिंगाचे निर्माण केले गेले आहे. तब्बल छत्तीसफुट उंच असलेल्या भगावान शिवलिंग यावेळी साकारण्यात आले असून भाविकांची एकच झुंबड दर्शनासाठी लागलेली आहे. याचवेळी भगवान शिवाचे बारा ज्योर्तिलिंगम दर्शन साकारण्यात आलेले असून विविध आध्यात्मिक रहस्योद्घाटन करणारी चित्र प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. अज्ञान निद्रेत झोपणाङया कुंभकर्णाची आरासही यावेळी साकारण्यात आली आहे.

परमात्मा ही काही पहाण्याची वस्तु नसून तीचे अस्तित्व म्हणजे परमात्म्याने मानवास दिलेले दैवीगुण होय. प्रत्येकात सुख, शांती, आनंद, प्रेम हे गुण परमेश्वराने आपणास दिलेले असून यापेक्षा परमात्म्याच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा असू शकत नाही असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी शिवरात्री महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. पहूर शहरात ब्रह्माकुमारीज् मार्फत साकारलेले भगवान शिवाचे विशालकाय भव्य छत्तीसफुटी शिवलिंग भाविकांचे आकर्षण ठरत आहे. माळी समाज मंगल कार्यालय पसिरारात महाशिवरात्री महोत्सवाचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले.

महाशिवरात्री निमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, जळगाव, सुमित पंडीत, समाजसेवक औरंगाबाद, राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित सौ. राजश्री पाटील, शेंदूर्णी, ब्रह्माकुमारी सुशिलादीदी, शितलदीदी, भगवान देशमुख, पंडीत पाटील, माऊंट आबूहून आलेले ब्रह्माकुमार विकास भाई, संदिपभाई,माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी.जि.प. सदस्य राजधर पांढरे,पहूर पेठ सरपंच नीता ताई,बाबुराव घोंगडे, उपसरपंच श्याम सावळे आदिंच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन भास्कर भाई यांनी केले. २१ फेब्रुवारी पर्यंत सदरहू शिवरात्री महोत्सव चालू राहणार असून उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content