जिल्ह्यात मिळणार १२१ इलेक्ट्रीक बस : पालकमंत्र्यांचा यशस्वी पाठपुरावा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यास तब्बल १२१ इलेक्ट्रीक बसेस मिळणार असून चार ठिकाणी चार्जींग स्टेशन्स उभारण्यात येणार आहे.

राज्यात लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस ही आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक पाचोरा २१, मुक्ताईनगर १७ , चोपडा २१ तर जिल्ह्यातील इतर भागांसाठी ६२ अश्या १२१ इलेक्ट्रिक बसेसला पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने मान्यता दिली असून लवकरच जिल्ह्यातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.

जळगाव, पाचोरा , चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारन्यासाठी बसेसच्या चार्जिंग करिता आवश्यक क ढ श्रळपश उपलब्ध करून देणे बाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक यांनी विभाग नियंत्रक जळगाव यांना दिलेले आहेत. जिल्ह्यातील प्रदूषणमुक्त व आरामदायी बससेवेमुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणारा असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

१०० साध्या नवीन बस मंजुरीचाही प्रस्ताव सादर !

दरम्यान, जळगाव विभागांमध्ये माहे नोव्हेंबर २०१९ मध्ये ८३९ वाहने होती तर सध्या ७२३ वाहने उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारणतः ५७ वाहने (बसेस) ही मोडकळीसं निघालेली आहे. विभागात बर्‍याचशा बसेस जुन्या झालेल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने रस्त्यात ब्रेक डाऊन होत असतात. त्यामुळे बर्‍याचश्या उशिरा धावतात व काही वेळेस फेर्‍या रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे रा.प. महामंडळाकडे लोकप्रतिनिधी , विध्यार्थी व प्रवाश्यांच्या मार्फत वारंवार तक्रार उद्भवत असतात.

आगामी काळात लग्नसराई असून महिलांना ५० % सवलतीमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार विभाग नियंत्रक बी.सी. जगनोर यांनी साध्या नवीन १०० बसेचा मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सदर केलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून नवीन १०० साध्या बसेस व १२१ इलेक्ट्रिक बसेस मिळाव्या अशी मागणी केली होती. त्यानुसार १२१ इलेक्ट्रिक बसेसला मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. १०० साध्या नवीन बसेस लवकरच उपलब्ध होतील असा विश्वास ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला .

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक बस सुरु करण्यचा शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यात १२१ अश्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे. विभाग नियंत्रक बी.सी. जगनोर यांना आपण दिलेल्या निर्देशानुसार सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यासाठी १२१ इलेक्ट्रिक बसेसला शासनाने मान्यता दिली आहे. साध्या नवीन १०० बसेसची वाढीव मागणीही आपण मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली असून लवकरच नवीन १०० बेसेस जिल्ह्यसाठी उपलब्ध होतील याची खात्री आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला व प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Protected Content