जळगाव जिल्हा अनलॉकच्या दिशेने : जाणून घ्या काय राहणार सुरू…काय बंद ?

जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार उद्या सकाळपासून बर्‍याच प्रमाणात शिथीलता देण्यात आली असून काही निर्बंध देखील कायम ठेवण्यात आले आहेत. https://livetrends.news जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत जारी केलेल्या निर्देशांची आम्ही आपल्याला विस्तृत माहिती देत आहोत.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील कमी पॉझिटीव्हीटी दर असणार्या १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर दोन दिवसांची अखेर राज्य सरकारने नोटिफिकेशन जाहीर केले होते. यानुसार राज्यात पॉझिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सीजन बेडवरील रूग्ण कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. https://livetrends.news राज्यात कमी संसर्ग असणार्‍या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात पुर्णपणे अनलॉक होण्याची शक्यता होती. तथापि, जिल्हाधिकार्‍यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही प्रमाणात तरी निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केले होते. लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे या आधी आपल्याला याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार रविवारी सायंकाळी अनलॉकबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केलेल्या निर्देशानुसार खालील प्रकारे अनलॉक करण्यात येणार आहे.

१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र यासाठी सॅनिटायझेानसह अन्य नियमांचे पालन करावे लागले. दुकानात एका वेळी पाच पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल. दुकानाच्या दर्शन भागामध्ये बँकेप्रमाणे काऊंटर लाऊन काच अथवा प्लास्टीकची पारदर्शक शीट लावावी लागणार आहे. यात फक्त विक्री होणारी वस्तूच जाऊ शकेल इतका भाग खुला ठेवावा लागेल. तर दुकानाच्या आता फेस शील्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील https://livetrends.news

३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील

४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग : https://livetrends.news पूर्ववत सुरू करण्यात येतील.

५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.

६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील

७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.

८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.

९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.

१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी

११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी

१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत

१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू

१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू

१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास आवश्यक राहील.

१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार

१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही. म्हणजेच संचारबंदी पूर्णपणे उठविण्यात आलेली आहे.

१९) कृषी विषयक कामे व दुकाने : नियमीतपणे सुरू.

२०) ई-कॉमर्सचे व्यवहार : नियमीतपणे सुरू राहणार.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केलेल्या निर्देशानुसार आता जिल्ह्यात बर्‍यापैकी अनलॉक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, सार्वजनीक कार्यक्रमांबाबत जिल्हा प्रशासन सजग असल्याचेही यातून अधोरेखीत झालेले आहे. https://livetrends.news आता जवळपास सर्व बाबी खुल्या होणार असल्या तरी शैक्षणिक संस्था आणि खासगी कोचींग क्लासेस यांच्याबाबत मात्र या निर्देशांमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे क्लासेस पुढे देखील बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आठवडे बाजारांबाबतही यात कोणताही उल्लेख नाही. म्हणजेच नियमीत बाजार सुरू राहणार असले तरी आठवडे बाजारांवरील बंदी मात्र कायम असणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी अनलॉकचे निर्देश जारी करतांना नागरिकांनी आधीप्रमाणेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.https://livetrends.news अर्थात सार्वजनीक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर, फिजीकल डिस्टन्सींग, सॅनिटायझेशन आदींचे नियम पाळावे लागणार आहेत. जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर कमी असल्याने अनलॉक करण्यात आलेले आहे. तथापि, भविष्यात हा दर पाच टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा निर्बंध लावण्यात येणार असल्याचेही यात स्पष्टपणे सांगितलेले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सध्या केलेला अनलॉक हा तात्पुरत्या स्वरूपात असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

Protected Content