जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात गेल्या वर्षीत १५ हजार २२४ जणांचा अपघातात मृत्यूमुखी पडले होते. अपघातात टॉप ५ मध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. यात पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि जळगाव याचा समावेश असून जळगाव जिल्हा पाचव्या क्रमांकवर आहे. महामार्गावरील अपघातात जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ५५२ जणांना मृत्यू झालेला आहे. अशी माहिती वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केले आहे.
जळगाव शहराजवळील पाळधी येथे पोलीस केंद्राचे उद्घाटन गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आदि उपस्थित होते.
डॉ. रवींद्रकुमार सिंघल पुढे म्हणाले की, राज्यात गेल्या वर्षीत १५ हजार २२४ जणांचा अपघातात मृत्यूमुखी पडले होते. तर जवळपास ३० हजारपेक्षा जास्त जखमी झालेले आहे. यातच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करावी अश्या सुचना सुप्रिम कोर्ट यांनी काढले आहे. यासाठी कोणताही पोलीस अधिकारी व कर्मचारी हा अपघाताबाबत प्रश्न विचारणार नाही. आज राज्यात ३ हजार ६०० मृत्यूंजय दूत हे काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान दुचाकीधारकांनी हेल्मेटचा वापर करावा, कार चालकांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असून वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी एनजीओच्या मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरीकांनी न घाबरता अपघातग्रस्तांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात मदत करावी जेणे करून त्याचा जीव वाचेल किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात यावे असे देखील आवाहन वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केले आहे.