जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी अधिकार्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे प्रशासकीय आदेश काढले आहेत.
डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. रात्री उशीरा हे आदेश निर्गमीत करण्यात आले. यात औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकात गडचिरोली येथून बदली होऊन आलेले संदीप अशोक हजारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच प्रमाणे पारोळा पोलीस स्थानकात जालना येथून बदलून येणारे रवींद्र पांडुरंग बागूल; रावेर पोलीस स्थानकात नाशिक ग्रामीणहून बदलून येणारे शीतलकुमार जयंतराव नाईक; एमआयडीसीमध्ये पुणे येथून बदलून येणारे जयेश धुडकू खलाणे; स्थागुशा शाखेत पुणे ग्रामीण येथून बदलून येणारे सिध्देश्वर हेमंत आखेगावकर; हर्षा जिभाऊ जाधव यांची चाळीसगाव ग्रामीणला; रूपाली संजय चव्हाण यांची भुसावळ तालुका येथे; गणेशपुरी बापूपुरी बुवा यांची जळगाव शहर; स्वप्नील किशोर नाईक यांची स्थागुशा शाखा; अनिल छब्बू मोरे यांची भुसावळ बाजारपेठ; राकेशसिंग सुरेशसिंग परदेशी यांची पहूर स्थानक (प्रभारी); तुषार मुरलीधी देवरे यांची एरंडोल; दीपक बिरारी यांची शनिपेठ तर धरमसिंग सुंदरडे यांची जामनेर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, यासोबत जिल्ह्यातील काही अधिकार्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यादेखील करण्यातआल्या आहेत. यात भीमराव बाबूराव नंदुरकर यांची जळगाव शहर; दिलीप कचरू शिरसाठ यांची जिल्हापेठ; संदीप सहदेव आराक यांची चोपडा ग्रामीण (प्रभारी); हनुमान लहानू गायकवाड यांची पाळधी दूरक्षेत्र (प्रभारी) तर राजेंद्र भीमसिंग मांडेकर यांची टिएमसी सेल या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.