जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असणार्या दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जंगी मुकाबला रंगण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटून गेल्यानंतरही तत्कालीन अध्यक्षा मंदाताई खडसे यांना मुदतवाढ मिळाली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, एकनाथ खडसे यांनी न्यायालयात जाऊन याला स्थगिती मिळविली. यानंतर दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झालेत. यावरून एकनाथराव खडसे यांनी थेट पोलीस स्थानकाच्या आवारातच रात्रभर झोपून आंदोलन केल्याने राज्यभरात याबाबत उत्सुकता निर्माण झाली.
या पार्श्वभूमिवर, आता जिल्हा दूध संघाची निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार दि. १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यात नामनिर्देशन पत्र दाखल करणे दि. ३ ते १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणुक कार्यालय दूध संघ, नामनिर्देशन पत्रांची छाननी- दि. ११ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र जाहीर करणे- दि. १४ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र माघार- दि. १४ ते २८ नोव्हेंबर, अंतीम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप- दि. २९ नोव्हेंबर, मतदान- दि. १० डिसेंबर सकाळी ८ ते ४ या वेळेत, मतमोजणी- दि. ११ डिसेंबर सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे.