जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाज कल्याण विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धां दि ४ व दि.५ रोजी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झालेल्या आहेत. सदर स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा वर्चस्व दिसून आले आहे. त्यामध्ये 100 मीटर धावणे पुरुष गटामध्ये संदेश शेळके अहिल्यानगर प्रथम. तर विवेक चव्हाण नंदुरबार द्वितीय ठरले आहेत. 100 मीटर महिला गटात माधुरी भागवत जळगाव प्रथम तर रोशनी अंभोरे जळगाव द्वितीय. २०० मीटर महिला सविता दळे अहिल्यानगर प्रथम ,माधुरी भागवत जळगाव द्वितीय. 200 मीटर पुरुष संदेश शेळके अहिल्यानगर प्रथम, विवेक चव्हाण नंदुरबार द्वितीय.
बुद्धिबळ पुरुष गटात देविदास नांदगावकर नाशिक प्रथम, रवींद्र लोंढे जळगाव द्वितीय. महिला बुद्धिबळात रोशनी अंभोरे जळगाव प्रथम, अनिता बागुल नंदुरबार द्वितीय. बॅडमिंटन महिला रोशनी अंभोरे जळगाव प्रथम, विद्या पारोळे अहिल्यानगर द्वितीय. बॅडमिंटन महिला डबल जळगाव संघ प्रथम, नाशिक संघ द्वितीय. टेबल टेनिस पुरुष सिंगल राकेश महाजन प्रथम नंदुरबार, योगेश पाटील जळगाव द्वितीय. पुरुष डबल नंदुरबार संघ प्रथम जळगाव संघ द्वितीय.
कबड्डीत अहिल्यानगर संघ प्रथम, नंदुरबार संघ द्वितीय. रस्सीखेच पुरुष जळगाव संघ प्रथम, धुळे द्वितीय.रस्सीखेच महिला नाशिक संघ प्रथम, अहिल्यानगर द्वितीय. हॉलीबॉल नंदुरबार संघ प्रथम नाशिक विभागीय कार्यालय द्वितीय. तर क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ विजयी ठरला आहे.तर नंदुरबार जिल्ह्याचा संघ उपविजयी ठरला आहे.दि ४ व ५ या दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे , नंदुरबार व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
समाज कल्याण नाशिक विभागातील सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी या नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धाचे यशस्वी आयोजन केले होते. दोन दिवस चाललेले या स्पर्धेमध्ये समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धातून निवड झालेल्या संघाचा व विजयी खेळाडूचा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी आयोजन कामी सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रामसिंग, कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.