आ.अमोल जावळे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाचे वरिष्ठ नेते आणि रावेर-यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक भाजप कायकर्त्यांनी आज जळगावात भाजपा कार्यालयात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे.

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन खरेदी-विक्री संघ, यावल येथे करण्यात आले होते. यावेळी यावल प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष नितीन बारी, महेंद्र पाटील, तुषार येवले, विशाल बारी, दीपक वारूळकर, सागर भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीत यशाच्या शुभेच्छा देत, पक्षाच्या उद्दिष्टांसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला डॉ. कुंदन फेगडे, उमेश फेगडे (तालुका अध्यक्ष), तेजस पाटील, नारायण बापू चौधरी, हेमराज फेगडे, व्यंकटेश बारी, राहुल बारी, बबलू येवले, रितेश बारी, स्नेहल फिरके, भूषण फेगडे, कोमल इंगळे, मुकेश कोळी, विशाल शिर्के, योगेश देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धोरणांना अधिक बळकटी देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. या सोहळ्याने पक्षाच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीत नवीन उर्जा संचारली असल्याचे दिसून आले.

Protected Content