जिल्ह्यातील कोरोना संसर्ग ओसरला; १०२ बाधीत रूग्ण; ३१२ झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । आजपासून अनलॉकची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली असतांना जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या देखील ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. गत चोवीस तासांमध्ये १०२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून ३१२ रूग्णांनी यावर मात केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने कमी होत आहे. गत चोवीस तासांमध्ये १०२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून ३१२ रूग्णांनी यावर मात केली आहे. यामुळे बाधीतांच्या संख्येपेक्षा बरे होणार्‍या रूग्णांची संख्या ही जवळपास तिप्पटपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे कोरोनामुळे गत चोवीस तासांमध्ये एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याची बाब दिलासादायक आहे.

 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-२ , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-५, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-४, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-४७, जामनेर-४, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण १०२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यातच्या आजच्या आकडेवारीनुसार आजवर जिल्ह्यात १ लाख ४० हजार ९९४  रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३५ हजार ६०१  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ८३८  रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात १  बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे

 

Protected Content