शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे राखून ठेवण्याचे जळगाव जिल्हा कृषि विभागाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात यंदा पाण्याची उपलब्धता असल्यामुळे उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाची लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाने राखून ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले की, सोयाबीनसाठी उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगाम अनुकुल मानला जातो, परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी हंगामातही सोयाबीन पिकाची लागवड करणे शक्य आहे. यासाठी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सोयाबीन पिकाची पेरणी करावी. जेणेकरुन एप्रिल महिन्यापर्यंत तापमान वाढण्यापूर्वी पीक काढणीस तयार होते. यामधुन पुढील खरीप हंगाम 2021 मध्ये लागवडीसाठी कमीत कमी 100 किलो सोयाबीन बियाणे यामधून राखीव ठेवता येईल. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडाही भासणार नाही. पुढील हंगामासाठी उत्कृष्ट प्रतीची उगवण क्षमता असणारे बियाणे जतन करुन ठेवता येईल. यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे. असे आवाहन   जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

 

Protected Content