रणधुमाळी सुरू : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ९ नगरपालिकांची निवडणूक

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्यानुसार राज्यात ९२ नगरपालिकांची निवडणूक होणार असून यात जळगाव जिल्ह्यात ९ नगरपालिकांचा समावेश आहे. यामुळे या नगरपालिकांची रणधुमाळी खर्‍या अर्थाने सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरीषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांचा समावेश आहे. यातील भुसावळ ही अ वर्गातील, अमळनेर आणि चाळीसगाव या ब वर्गातील तर अन्य क वर्गातील नगरपालिका आहेत. तर जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांचे मतदान पुढील टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या नगरपालिकांसाठी २२ ते २८ जुलै २०२२ च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. यानंतर २९ रोजी छाननी होऊन ४ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दिनांक १८ रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता नऊ ठिकाणी रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content