जळगावात पत्ता विचारण्याच्या कारणावरून दोघांना मारहाण

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिघांनी दोघांला मारहाण करून एकाला पायाला दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शुभम मनोज सोनवणे (वय-19) रा. सागरपार्क मार्ग, गणपती मंदीरजवळ हा 2 जानेवारी रोजी मित्रांसोबत मेहरूण येथील श्याम सुभाष तानसर रा. रामेश्वर कॉलनी यांच्यासोबत दारू पिऊन घरी परत येत असतांना हॉटेल रॉयल पॅलेससमोर मित्राने सोडले. त्यावेळी अनोळखी तिघांनी श्याम पत्ता विचारला. थोड्यावेळानंतर श्यामला तिघांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यात आवराआवर करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी शुभम याच्या पायाला काठ्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर तिघे फरार झाले होते. शुभम सोनवणे याच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content