जळगावात वृध्दाच्या दुचाकीला कारची धडक; कार चालकाविरूध्द गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । मुलाला उपचारासाठी घेवून जाणाऱ्या वृध्द पित्याच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अजिंठा रस्त्यावरील काशिनाथ चौकात घडली. यात वृध्द पिता प्रताप हरी मराठे (वय-७०, रा़ श्रीकृष्णनगर, सुप्रीम कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रताप मराठे हे श्रीकृष्णनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ सोमवारी दुपारी मुलगा कमलेश याच्या पायाला खिळ्यामुळे दुखापत झाली़ म्हणून त्याला दुचाकी क्रमांक एमएच१९/ ई ९११४ वरून उपचारासाठी प्रताप मराठे हे श्रीकृष्ण कॉलनीकडून शहराकडे निघाले़ दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अंजिठा रस्त्यावरील काशिनाथ चौकात बस प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. त्यामुळे पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मराठे यांनी देखील दुचाकी बसच्या मागे थांबविली. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणारी कारने एमएच १२/ पीएच ८४४०)त्यांना जोरदार धडक दिली़ अन् दुचाकी ही बसला आदळली. यात प्रताप मराठे यांच्या हाताला गंभीर दुखातप झाली. कार चालकाला नाव गाव विचारले असता त्याने काहीही न सांगता तेथून पसार झाला़ अखेर जिल्हा रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content