जिल्ह्यात दोन लाख कोरोना चाचण्या पूर्ण; रिकव्हरीचे प्रमाण वाढले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आजवरच्या कोरोना चाचण्यांचा आकडा दोन लाखांच्या पार गेला असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील लक्षणीयपणे वाढल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत २ लाख २ हजार ५४६ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने गेल्या बारा दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली असून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३ हजारने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ९३ हजार ५११ तर रॅपिड न्टीजेन टेस्टद्वारे १ लाख ९ हजार ३५ अशा एकूण २ लाख २ हजार ५४६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १ लाख ५२ हजार ६५५ चाचण्या निगेटिव्ह तर ४७ हजार ९०७ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या १ हजार ११४ असून ८७० अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात सध्या ७ हजार १०१ बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार ५१३ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ६५१, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५३२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २ हजार ४०५ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही ३२८ रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले ५ हजार ९१८ रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार १८३ इतकी आहे. यापैकी ६३१ रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून २०८ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १७५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा २.४५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये १२ हजार ८५४ इतके बेड आहेत. यात ३२२ आयसीयू बेड तर २ हजार १९ ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

तालुकानिहाय रूग्णांची संख्या

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ९०७ इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर १०८३५, जळगाव ग्रामीण २३७३, भुसावळ ३२८१, अमळनेर ४११८, चोपडा ४०२५, पाचोरा १८१३, भडगाव १७८६, धरणगाव २१०३, यावल १५९७, एरंडोल २७३८, जामनेर ३२९०, रावेर १९९२, पारोळा २४०५, चाळीसगाव ३१२१, मुक्ताईनगर १२८६, बोदवड ७७१, दुसर्‍या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या ३७४ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या

जळगाव शहर ८७१९, जळगाव ग्रामीण १६१३, भुसावळ २३२३, अमळनेर ३७५०, चोपडा ३२३१, पाचोरा १६६०, भडगाव १६२०, धरणगाव १८६४, यावल १४०१, एरंडोल २०५४, जामनेर २८३४, रावेर १४८७, पारोळा २०५९, चाळीसगाव २९०५, मुक्ताईनगर १२१०, बोदवड ६२६, इतर जिल्ह्यातील २७५ याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३२ हजार ९४१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले ७ हजार १०१ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर १८७०, जळगाव ग्रामीण ६८२, भुसावळ ८२३, अमळनेर २७१, चोपडा ७२२, पाचोरा ८३, भडगाव १२५, धरणगाव १९०, यावल १३७, एरंडोल ६३९, जामनेर ३८७, रावेर ४१७, पारोळा ३२८, चाळीसगाव १४६, मुक्ताईनगर ४७, बोदवड १३५, दुसर्‍या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९९ रुग्णांचा समावेश आहे.

पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २०४ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २ हजार ४१८, शहरी भागातील १ हजार ३१२ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील १ हजार ४७४ ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी ६ हजार ५०२ टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात २ लाख ५६ हजार ३५० घरांचा समावेश असून यात ११ लाख १८ हजार ३७ इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-१९, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

Protected Content