अर्धांगिनी झाली कोरोनामुक्त आणि पतीने आरती ओवाळून केले स्वागत !

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाच्या भयंकर बातम्यांनी भावना गोठून गेल्या असतांना मनाला उभारी देणारी एक घटना घडली आहे. आपली पत्नी कोरोनावर मात करून घरी आल्यावर एका पतीने तिचे आरती उतारून केलेले स्वागत हे कौतुकाचा विषय बनले आहे. पत्रकार नरेश बागडे यांची ही कृती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

पत्रकार तथा नृत्य प्रशिक्षक नरेश बागडे आणि त्यांची पत्नी राधिका यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. यात पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना इकरा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना ऑक्सीजन बेडवर उपचार करण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर त्या आज शनिवारी दुपारी आपल्या घरी परतल्या. यावेळी घरीच होम क्वारंटाईन असलेले त्यांचे पती नरेश बागडे यांनी आपल्या सौभाग्यवतीचे चक्क आरती उतारून स्वागत केले. नेहमीच महिला या पुरूषांची आरती ओवाळत असतात. तथापि, नरेश बागडे यांनी याच्या अगदी उलट आपल्या पत्नीची आरती उतारून त्यांचे घरी स्वागत केले.

या संदर्भात नरेश बागडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, इकरा कोविड केअर सेंटरमध्ये माझ्या पत्नीवर चांगले उपचार झाल्याने आज ती घरी आली आहे. हा अतिशय आनंदाचा प्रसंग असून याचमुळे मी माझ्या पत्नीचे आरती ओवाळून स्वागत केले. या माध्यमातून आपण डॉक्टर्ससह अन्य मित्रमंडळी आणि अडचणीत मदत करणार्‍यांबाबतही कृतज्ञता व्यक्त केलीच आहे. तर सौभाग्यवती सुखरूप परतल्याने तिची आरती ओवाळण्याची भावना मनात आल्याचे नरेश बागडे म्हणाले.

दरम्यान, नरेश बागडे यांनी सोशल मीडियात एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट जशीच्या तशी आपल्याला सादर करत आहोत.

कृतज्ञता

🙏🙏
आज कोरोनाची इतकी भयंकर परिस्थिती आहे, की संपूर्ण कुटुंबचे कुटुंब बाधित होत आहेत. माझी पत्नी राधिका बागडे हिला ज्या वेळेस कोरोनाची लागण होताच मनात धडकी भरली की आता कस होईल, काय होईल कारण महिलांच्या मनात वेगळीच भीती असते त्यात माझी धर्मपत्नी सुद्धा फारच घाबरून गेली होती. पण कोरोनाचा संकटाचा सामना करत असतानाच मला माझे जिवलग मित्र व गुरुदेव सचिन लढढा, तसेच संकटमोचन भाऊ विजय बागडे, व डॉक्टर हे देवरूपी असतात त्याच प्रमाणे ईकरा हॉस्पिटलचे डॉ.राजेश जेन,डॉ.नरेंद्र पाटील व त्याचे सहकारी व नर्स स्टाफ तसेच डॉ.प्रशांत मंत्री,डॉ.महेंद्र पाटील व मित्र अविनाश दुसाने
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचा पीआरओ विश्वजीत चौधरी यांच्या अथक प्रयत्नाने आज माझी पत्नी राधिका हीने कोरोनावर मात करून घरी आली आहे.

खरच ज्यांना कोरोनाची लागण होते.त्यानाच कळत की कोरोना किती भयानक आहे. हा कोरोना कोण्या दुष्मनाला भी नको झाला पाहिजे.

परिवाराची व मित्राची साथ

गेल्या 12 एप्रिल पासून माझी पत्नी राधिकाला कोरोनाचा फारच त्रास होत होता. सर्वात प्रथम आमचे फमिली डॉ.प्रशांत मंत्री यांच्या सल्ल्याने औषधी उपचार केले.मात्र तिचा त्रास कमी होत न्हवता शेवटी मग माझे भाऊ विजय बागडे यांना कळलं की वहिनीची तबीयत बरी होत नाही त्याने क्षणाचा विलंब न करता डायरेक्ट सिरसोली रोडवरील ईकरा हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर मध्ये दि.15 एप्रिल रोजी उपचारासाठी ट्रीबल CCC वॉर्ड मध्ये दाखल केले.

पण तिची तबीयत बरी होत नसल्याने विजय बागडे, अजय बागडे व पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांनी डॉ. राजेश जेन व डॉ.नरेंद्र पाटील याच्याशी चर्चा करून पत्नीला ऑक्सिजन वॉर्डमध्ये दाखल करून तिला O(2)
ऑक्सिजन लावण्यात आला आणि तिची तबीयतमध्ये सुधारणा होत गेली.

यावेळी ईकरा कोविड सेंटरचे सर्व डॉक्टर व नर्स स्टाफ यांच्या प्रयत्नानंतर तीची प्रकृतीत सुधारणा झाली. ईकराच्या टीमवर्कचे आभार… ईकरा हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिपत्याखाली देखरेख सुरू असून
खरच लोकांच्या मनात ईकरा हॉस्पिटलबाबत गैरसमज व चुकीचा प्रचार केला जातो की लक्ष दिले जात नाही. पण मी समक्ष बघितले आहे की प्रत्येक रुग्णाची अंत्यत बारीक लक्ष देऊन टीमवर्क कडून काळजी घेतली जाते. सर्व नियोजन बद्ध उपचार केला जातो याबाबत तीळ मात्र शंका नाही

खरच ईकरा युनानी हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीची काळजी घेतल्याने ती दिनांक 24 एप्रिल शनिवार रोजी घरी आली ईकरा युनानी हॉस्पिटलच्या टीमचा मी शतशः 🙏आभारी🙏

यावेळी मित्र विश्वजीत चौधरी, अविनाश दुसाने, निलेश जोशी, राहुल नेतलेकर,संजय मोती,वीर दहियेकर, राजू उमप,दिनेश गोयर, देशदूतचे आयटी हेड प्रवीण आढाव, व देशदूत नाशिक विभागचे देशदूत डिजिटल ऑनलाइनचे प्रमुख जितेंद्र झवर सर,पोलीस कॉन्टेबल व लेखक विनोद अहिरे, गोटी दीदी, दक्षा दीदी,संध्याजी यांनी फोनद्वारे नियमितपणे विचारपूस करीत माझी हिम्मत वाढवली. मित्र व परिवार धावून आले कोणी फोनवरून तर कोणी स्वतः लक्ष दिले.

भाऊ विजय बागडे व त्याची पत्नी राखी बागडे यांनी तर माझ्या आई वडिलांची भूमिका पार पाडले. तर भाऊ अजय बागडे त्याची पत्नी आशा बागडे, भाऊ योगेश बागडे त्याची पत्नी ज्योती बागडे, सीमा ताई, भारती ताई, ज्योती ताई,सचिन बाटुगे ,विक्की बाटुगे,जयकिशन बाटुगे,सावन बाटुगे, बाळू टिळगे, अनिल नेतलेकर, राधिका नेतलेकर,रोहित नेतलेकर, दिशा नेतलेकर, यांचीपण मोलाची साथ राहिली.

संतोष बागडे, मावशी श्रीमती छायाबाई बागडे, मामा प्रकाश मछले, काका धारासिग तमायचे (कोल्हापूर), काका शशी तमायचे (इचलकरंजी), आनंद बागडे (अमळनेर) योगेश (आबा) बागडे (पुणे), टीना तमायचे (कोल्हापूर), रंजना सुभाष गारुगे, संजय बाटुगे (नंदुरबार), रोहिन व रीना बाटुगे (अमळनेर) योगेश अनिल बागडे, ,टीमीताई दिलीप गागडे, अनिता अभंगे, विष्णू भाट (पुणे), जयराज भाट (इचलकरंजी), मित्र धनराज सोनार,भेयासाहेब बोरसे भगवान सोनार (पत्रकार), हवसराव (सुनील) कांबळे, अरुण देशमुख साहेब,(शेंदुरणी ); डान्स कॉरियोग्राफर अखिल तीलकपुरे, बी आनंदकुमार, सुनील दाभाडे, विजय नेवे, रवी मधान आदीनि नियमितपणे फोनद्वारे तबीयतबाबत विचारपूस करीत असल्याने माझ्या मनातून भीती दूर झाली.

माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने राहुल नेतलेकर व वीर दहीयेकर यांनी तर असे ठरवले होते की आपण चागल्या आणि सुसज्ज खाजगी हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीला उपचारासाठी दाखल करू धन्यवाद राहुल आणि वीर दादा

🙏🙏

मला पण सौम्य लक्षणे होते मात्र माझे जिवलग मित्र व गुरुदेव श्री सचिन लढढा यांनी डॉ.महेंद्र पाटील यांच्याकडे दाखवून उपचार सुरू करा असा सल्ला दिल्याने डॉक्टर पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेतल्याने मी एकदम टका टक झालो

मित्र व कुटूंबातील सदस्य तसेच पत्रकार मित्र, यांच्या सहकार्याने व आशीर्वादाने या कोरोनाच्या संकटातून आज आम्हीं दोघेजण सुखरूप बाहेर पडलो

सर्वाचा प्रेम व आशीर्वाद असेच असू द्या

आपला हक्काचा मित्र

नरेश बागडे
जळगाव
8788632712

Protected Content