जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात ११९१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहर व चोपड्याच्या पाठोपाठ आता भुसावळातही संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवसांचे कडक निर्बंध लादले असून आज याचा शेवटचा दिवस आहे. तर आज सायंकाळी प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ११९१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच ९२९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजच्या आकडेवारीचा विचार केला असता जळगाव शहरात १७१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यात तब्बल २२३ पेशंट निष्पन्न झाले आहेत. तर आज भुसावळ तालुक्यात १९३ पेशंट समोर आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता; जळगाव शहर-१७१, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ-१९३, अमळनेर-१२०, चोपडा-२३३, पाचोरा-४१, भडगाव-४८, धरणगाव-४८, यावल-२४, एरंडोल-६५, जामनेर-४६, रावेर-२६, पारोळा-२०, चाळीसगाव-५६, मुक्ताईनगर-३१, बोदवड-२० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण १ हजार १९१ रूग्ण आढळून आले आहे.
कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८७ हजार ८७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७४ हजार ५९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ६७४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-३, यावल-१, धरणगाव-३, एरंडोल-३, जामनेर-१, पारोळा-२ आणि बोदवड-१ असे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.