Home आरोग्य अखेर बेपत्ता कोरोना बाधीत महिला पुन्हा रूग्णालयात दाखल

अखेर बेपत्ता कोरोना बाधीत महिला पुन्हा रूग्णालयात दाखल

0
29

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिरसोली येथील महिला उपचार घेत असतांना तेथून बेपत्ता झाल्याने प्रशासकीय यंत्रणा धास्तावली असतांना ती महिला पुन्हा आढळून आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत वृत्त असे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा कोविड रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये शिरसोली येथील महिला उपचारासाठी दाखल झाली होती. दुपारी तीनच्या सुमारास ही महिला तिच्या बेडवरून गायब झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार देखील देण्यात आली.

दरम्यान, कोविड रुग्णालयाच्या तक्रार निवारण कक्षाचे प्रमोद वानखेडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याला माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधून काढले. रात्री तिला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला दाखल केले. अनेक तासांपर्यंत हा प्रकार सुरू राहिल्यानंतर ती महिला अखेरीस पुन्हा अ‍ॅडमीट झाल्याने आरोग्य यंत्रणांचा जीव भांड्यात पडला.


Protected Content

Play sound