जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोेना रूग्णांच्या संख्येचा आलेख वाढतच असून आज रूग्णसंख्येने साडेतीनशेचा आकडा पार केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यातच आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५४ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या अहवालानुसार जळगाव शहर-१०८; जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ १३२; अमळनेर-१९; चोपडा-१९; भडगाव-३; यावल-२; एरंडोल-४; जामनेर-१०; रावेर-६: पारोळा-१२; चाळीसगाव-१४; मुक्ताईनगर-६ आणि बोदवड-७ रूग्ण आढळून आले आहेत. यात पाचोरा आणि धरणगाव तालुक्यांमध्ये एकही पेशंट आढळून आलेला नाही.
जिल्ह्यात एकूण २१२१ सक्रीय कोरोना रूग्ण असून यातील ४४ पेशंट हे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून, ६२ पेशंट कोविड रूग्णालयात असून यातील ११ जण ऑक्सीजनवर आहेत. इतर सर्व जण होम क्वॉरंटाईन असल्याची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे.