भुसावळात जी.एम.मित्तल यांचा भगवा सत्कार

bhusaval mittal

भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे कामगार सेना भुसावळ विभागातर्फे आज महाप्रबंधक जी.एम.मित्तल यांचा भगवी टोपी, भगवी शाल देवून भगवा सत्कार करण्यात आला

याप्रसंगी यावल नाका ते झेडटीएसपर्यंत अतिशय खराब झालेला रस्ता यावर आक्रमक पणे ललितकुमार मुथा यानी जीएम, डीआरएम व प्रशासन यांना धारेवर धरले. जीएम व डीआरएम यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या ताब्यात रोड आहे, रेल्वेच्या ताब्यात रोड़ आल्यावर आम्ही दुरुस्त करू, यावर ललितकुमार मुथा यांनी सांगितले की, जर नगरपालिका व रेल्वे रोड दुरुस्त करू शकत नसेल तर रेल्वे कामगार सेना रोड दुरुस्त करण्यास समर्थ आहे.

रेल्वे कामगारांचा मागण्या
जवळपास ७ हजार कर्मचारी यावल नाका ते झेडआरटीआयपर्यंत या रोडचा वापर करतात. डीआरएम बंदच्या मेन गेट वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणे, एमओएच वर्कशॉप आहे की रनिंग शेड, जूनी पेंशन स्कीम चालू करने, Ex सर्विस मैन (सेवानिवृत्त मिलीट्रीवाले) यांची बदली, सिनियर ALP यांना 80:20 चा एरियस देने, पॉइंटसमन व गेटमैन यांची 12 ऐवजी 8 तास ड्यूटी करणे, POH सहित सर्व डिपार्टमेंट मध्ये लार्जस स्किम सुरू करणे, रेल्वे दवाखान्यात भायखला जानेसाठी एक्स्ट्रा रिजर्वेशन खिड़की सुरू करणे, नाईट पेट्रोलिंग साठी 2 ट्रैकमैन देणे, सर्व विभागातुन GDCE परीक्षा घेणे जेणेकरून सर्वाना TC, ड्राइवर, गार्ड, लिपिक बनता येईल, सर्व विभागात वेळेवर प्रमोशन व्हायलांच हवे, TRD विभागातील सर्व कामगाराना जोखिम भत्ता देण्यात यावा, रेल्वे दवाखान्यात हुशार डाक्टरांची नेमणूक करणे, उच्च प्रतीची औषधी उपलब्ध करणे व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले

यांची होती उपस्थिती
यावेळी ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, रामदास आवटे, प्रितम टाक, M K शहा, सुरेंद्र यादव, प्रकाश करसाळे, पंकज ठाकरे, विशाल कुंवर, महेंद्र भोळे, संजय चौधरी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच रेल्वे कामगार सेनेचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी- नगरपालिका भुसावल यांना भेटून यावल रोड- ZTS पर्यंत कुणाच्या ताब्यात आहे. याबाबत सविस्तर माहिती घेणार आहे.

Protected Content