Home Cities जळगाव हिंदू महासभेच्या कृत्याचा काँग्रेततर्फे निषेध

हिंदू महासभेच्या कृत्याचा काँग्रेततर्फे निषेध

0
29

जळगाव प्रतिनिधी । हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा निषेध आज जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आला.

हिंदू महासभेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे प्रकरण देशभरात वादाच्या भोवर्‍यात सापडले असून याचा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या कृत्याचा देशभरातून काँग्रेसतर्फे निषेध करावा असे निर्देश पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी दिले होते. यानुसार आज काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात निषेध व्यक्त करण्यात आला. यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळी पट्टी बांधून या भ्याड कृत्याचा निषेध केला. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी,डॉ. अर्जुन भंगाळे, देवेंद्र मराठे,अजबराव पाटील, शाम तायडे, संदिप तेले,डॉ शोएब पटेल,मूजीब पटेल,अॅड.फैसल शेख,देवेंद्र मराठे,अमजद पठाण ,जगदिश गाढे, श्रीधर चौधरी,राजस कोतवाल,विजय वाणी,जमिल शेख,योगेश देशमूख,पी.जी.पाटील,जाकिर बागवान,प्रल्हाद सोनवने,फारूख शेख,दिपक सोनवने, मनोज चौधरी,राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound