जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सध्या काही नेत्यांमध्ये राजकीय नाट्य रंगले असले तरी याचा नाट्यगृहासाठीच्या निधीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची मिश्कील टीका खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
साठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते म्हणाले की,संभाजीराजे नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग करताना विजबिलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर समस्या होऊन बसला आहे. जेष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी ही समस्या सोडवण्यासाठी मला विनंती केली आहे.येत्या काळात आमदार राजू मामा भोळे, आमदार चंदुभाई पटेल यांच्यासह अनेकांचा निधी घेऊन नाट्यगृहाच्या छतावर सोलर युनिट बसवून हा विजबिलाचा प्रश्न मार्गी लावता येईल का याबाबत जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन अंतिम निर्णय घेण्यास भाग पाडतो.
दरम्यान, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सद्यस्थितीतील राजकीय नाट्यावर भाष्य देखील केले. ते म्हणाले की, सध्या राजकारणात पुढार्यांची नाट्य स्पर्धा सुरू असून या जळगावच्या जिल्हयाच्या राजकीय नाटयाचा नाट्यगृहासाठीच्या निधीवर कुठलाही परिणाम होणार नाही.असे सडेतोड प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमालाआमदार राजु मामा भोळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.