Home Cities जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी आदिवासी पाड्यावर साजरी केली संक्रांत

जिल्हाधिकार्‍यांनी आदिवासी पाड्यावर साजरी केली संक्रांत

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन संक्रांत साजरी केली.

काल सर्वत्र मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पालपासून तब्बल ८७ किलोमीटर अंतरावर असलेल्या जामन्या-गाडर्‍या, लंगडा आंबा आदी दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर आपली संक्रांत साजरी केली.

अमन मित्तल यांनी आदिवासी बांधवांना भेटवस्तू देऊन त्यांच्याशी वार्तालाप साधला. याप्रसंगी त्यांच्या सोबत महसूल आणि कृषी खात्यातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती. त्यांनी परिसरात शासनातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांची माहिती देखील जाणून घेतली.


Protected Content

Play sound