जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बहुचर्चीत बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर याला अखेर जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराने एके काळी प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बहुतांश संचालक अद्यापही कारागृहातच आहेत. यानंतर बँकेवर जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले. मात्र त्यांनी इतर दलालांना हाताशी धरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याची उघडकीस आले आहे. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायीक सुनील झंवर याचाही समावेश होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. मध्यंतरी त्यांना अटकेपासून १५ दिवस दिलासा मिळाला होता. यानंतर मात्र त्यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर १० ऑगस्ट २०२१ रोजी त्याला पहाटे पोलिसांनी नाशिक येथून अटक झाली आहे.
यानंतर सुनील झंवर याचा जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आला होता. तथापि, आज त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.